लाखो श्रध्दावानांच्या उपस्थित संत ताजउद्दिन बाबांचा १६४ वा वाढदिवस उत्साहात साजरा… — नागपूर येथील दोन्ही श्रध्दास्थळाला भेट देऊन लाखो नागरिकांनी घेतले दर्शन…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

           वृत्त संपादीका 

           नागपूर येथील मोठा ताजबाग व लहान ताजबाग येथे संत ताजउद्दिन बाबांचा,”वाढदिवस,२७ जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

   

           यावर्षी सुध्दा संत ताजउद्दिन बांबांचा १६४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

               घोडा आणि संदल,बॅन्ड,वाद्यांच्या तालासुरात संत ताजउद्दिन बाबांच्या समाधिवर चादर चढवली जाते आणि केक कापून मोठ्या श्रद्धेने त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय.

              याचबरोबर यादिवशी रक्तदान शिबीरांचे आयोजन जागोजागी करण्यात येते तर विविध ठिकाणी पाणी,बुंदीचे आणि आलुभातांचे वाटप श्रध्दावंतांकडून अफार श्रध्देने केले जातय.

         तद्वतच अख्या नागपूर मधून संदल आणि बँडच्या तालात मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात येतात.

         संत ताजउद्दिन बाबांच्या दोन्ही स्थळावर सातत्याने देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.