शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर ग्रामपंचायत द्वारा गणराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
२६ जानेवारी २०२५ ला ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर येथे पार पडलेल्या ध्वजारोहन कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरपूर नगरीचे प्रथम नागरिक श्री.साईश सतिष वारजूकर (सरपंच) हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी हे होते.त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायतचे सर्वश्री पदाधिकारी सौ.सविताताई चौधरी सदस्या,श्री.निखीलभाऊ गायकवाड सदस्य,श्री.शंकरभाऊ शेरकी सदस्य,सौ.बेबीताई डहारे सदस्या,सौ.सपनाताई घडसे सदस्या,सौ.रंजनाताई उईके सदस्या,सौ.वंदनाताई सहारे सदस्या,श्रीमती.यश्वकलाताई ढोक सदस्या,सौ.शारदाताई गायकवाड सदस्या हे प्रामुख्याने उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून माजी प.स.सदस्या सौ.भावनाताई बावनकर ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित होत्या.
तद्वतच कर्मचारी वर्ग, प्रतिष्ठीत नागरिक तथा शंकरपूर परिसरातील मान्यवर मंडळी व सर्व शाळेतील विद्यार्थी,गुरुजन वर्ग उपस्थित होते.