संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मयतांच्या नावावर १ करोड ८५ लाख रुपयांची उचल.‌‌ — घटना अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे यांच्या द्वारे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल होताच ३५ लाख रुपयांचा भरणा.. — उर्वरित दिड करोड रुपये केंव्हा भरणार? भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई का म्हणून नाही?

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       जागरुक,कर्तव्यदक्ष तथा घटना अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे (पटवारी) यांनी गंभीर रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देताच चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधितांकडून ३४ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत भरले,उर्वरित १ करोड ५० लाख रुपये चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा हे शासनाच्या तिजोरीत कधी भरणार?हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

        ज्याअर्थी मय्यत असलेल्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी बनवून त्यांच्या नावाने १ करोड ८५ लाख रुपयांवर (एक करोड, पंचाशी लाख रुपयांवर) जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी डल्ला मारला होता.त्याअर्थी जिवंत मानसाचे नावाने किती करोड रुपये खात असेल? हा प्रश्न विनोद खोब्रागडे यांचा आहे.

        मेलेल्या व्यक्तींच्या नावाने संजय गांधी निराधार योजना अंतर्गत रुपये अफरातफरीची विनोदकुमार खोब्रागडे यांनी गंभीर रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करताच ३४ लाख रुपये भरले,उर्वरित १ करोड ५१ लाख रुपये जिल्हाधिकारी चंद्रपूर कधी भरणार?हा प्रश्न आहे.

        जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी सी व तत्कालीन जिल्हाधिकारी अजय अण्णासाहेब गुल्हाने,प्रशांत सुभाष बेडसे तत्कालीन तहसीलदार,प्रविण चिडे प्रभारी तहसीलदार व ईतर अधिकारी विरुद्ध गंभीर रिपोर्ट देताच ३४ लाख रुपये,(चौवतीस लाख रुपये) तहसीलचे बाबु पांडुरंग नंदुरकर यांना FIR ची धमकी देऊन जवळुन भरायला लावले..

      विद्यार्थीनींच्या मोबाईल वर १० लाख ४६ हजार रुपये/- (दहा लाख छेचाळीस हजार रुपये जमा झाले) जमा झाले,तर त्यांनी ३४ लाख रुपये,(चौवतीस लाख रुपये) दिनांक २४/०१/२०२५ ला भरले कसे?

       उर्वरित १ करोड ५० लाख रुपये (एक करोड पन्नास लाख रुपये) तहसीलदार व जिल्हाधिकारी चंद्रपूर कधी भरणार?

         मेलेल्या व्यक्तींच्या नावाने संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थ्यी दाखवून करोडो रुपयांचा निधी काढून,डल्ला मारणारे जिवती येथील तहसीलदार यांच्यावर फौजदारी कारवाई महाराष्ट्र शासन करणार आहे काय? असा रोखठोक सवाल विनोदकुमार खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक यांचा आहे.

          ज्याअर्थी चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत जिवती तालुक्यातील मेलेल्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनांचे लाभार्थी यांचे करोडो रुपये तत्कालीन तहसीलदार जिवती व प्रभारी तहसीलदार जिवती आणि इतर महसूल अधिकारी यांनी सन दिनांक ०१/०१/२०१७ पासून आजपर्यंत हळप केले व खाल्ले.‌त्याअर्थी जिवंत मानसाचे किती खाल्ले असेल यासंबंधाने विचार करने गरजेचे झाले आहे.‌

        संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मेलेल्या व्यक्तींच्या नावाने करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा वर्तमान पत्रांच्या बातम्या द्वारे बाहेर पडताच,”चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत नागरिक म्हणू लागले आहेत, की ” मेलेल्या व्यक्तींच्या नावाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करताना,”यांना जनाची नाही तर मनाची थोडीही लाज वाटली नाही का?

          मुख्यमंत्री,तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासन,आपण जातीने लक्ष घालून अशा भ्रष्टाचारी अधिकारी यांची प्रापर्टी जप्त करावी अशी मागणी तक्रारदार विनोद कुमार खोब्रागडे यांची आहे..

     चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनांचे रुपये वळते होत असल्याने त्यांचे या भ्रष्टाचारात काही सहभाग आहे काय?या संबंधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोपनीय चौकशी करणार काय?हा प्रश्न उपस्थित होतो आहे‌.

तद्वतच सन २०२२ ला याच भ्रष्टाचार प्रकरणाची तक्रार चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल केली होती‌‌.असे असताना ते सर्व अधिकारी आतापर्यंत चूप कसे काय होते? हा मुद्दा भयंकर गंभीरता निर्माण करतो आहे.

*****

      एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही..‌

     समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद!

******

अपीलार्थी..

    संघर्षी…

    आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर

— ९८५०३८२४२६..‌
— ८३२९४२३२६१..