काँग्रेस कार्यालयात 76 व्या गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस :- 26 जानेवारी 1950 साली ब्रिटिशांचे जुलमी काळे कायदे संपूष्ठात आले यादिवशी भारतात लोकशाही प्रस्थापित होऊन देशाच्या विकासासाठी कायदे लागू करण्यात आले. 

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 02 वर्ष 11 महिने व 18 दिवसाच्या अथक परिश्रमाने देशाची राज्यघटना निर्माण करण्यात आली. 

          आज देशाच्या 76 व्या गणतंत्र दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी घुग्घूस शहर काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात पार पडला काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगने यांनी भारतीय ध्वज तिरंगा फडकविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांना निमंत्रित केले.

         रेड्डी यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला राष्ट्रध्वजाला सामूहिक मानवंदना देण्यात आली.

          यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन करून शहीद वीर जवानांचे समरण करण्यात आला उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले.

            याप्रसंगी ज्येष्ठ नेते जयंता जोगी, कुणबी समाज अध्यक्ष सुधाकर बांदूरकर, सैय्यद अनवर, काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, विशाल मादर तालुका सचिव, रोशन दंतलवार सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, विजय माटला, शेखर तंगडपल्ली, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, सिनू गुडला तालुका उपाध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,जिल्हा सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे,संध्या मंडल, सरस्वती कोवे,सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे, सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे, दिपक पेंदोर, शहशाह शेख, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने नागरिकगन उपस्थित होते.