युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

        रामदास ठुसे

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

 

चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील युवती स्वाती सुनील चौधरी वय 19 वर्षे हिने दिनांक 25 जानेवारी 2025 ला सकाळी साडेसातच्या दरम्यान घराच्या आड्याला ओढणीने लटकवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

      माहिती प्रमाणे सकाळी आई- वडील आणि आजी- आजोबा,बहिण-भाऊ सगळे कामात असताना स्वातीने आपल्या खोलीत दार बंद करून ओढणीने गळ्यात फास लावून गळफास लावीत आत्महत्या केली.

        काही वेळानंतर आजोबा तिला उठवायला गेले असता आत मधून दार बंद असल्याचे दिसले. त्यांनी खिडकी मधून वाकून पाहिले असता स्वाती ही ओढणीने गळफास लावून लटकून दिसून आली. 

        ते दृश्य पाहून आजोबाने आरडा ओरड केली असता घराजवळील नागरिकांनी धावून घटनास्थळी येऊन रूमचे दार तोडून तिला खाली उतरवले आणि पोलीस चौकी शंकरपूर ला घटनेची माहिती देण्यात आली.

           पोलिसांनी मर्ग दाखल करून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

         पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चांदे यांचे मार्गदर्शनात शंकरपूर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक वाघ,पोलीस हवालदार नन्नावरे, शिपाई नागरगोजे,शिपाई गोडमारे करीत आहेत.