15 ऑगस्ट 1947 ला भारतीय जनतेस स्वातंत्र्य मिळाले.हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली.हुकूमशाही गेली आणि लोकशाही आली.भारतीय जनता एका राजाची प्रजा होती,ती आता नागरिक झाली.तिला मतदानाचा अधिकार मिळाला.जनताच राजा झाली.मतदार राजा,आणि राजा पण मतदार झाला.याचा अर्थ कुणी राजा कुणी प्रजा नको.तर सारेच मतदार राजा होऊ,हे भारतीय जनतेनी ठरविले.आणि आपण सारेच जण आपले प्रतिनिधी द्वारे राज्यकारभार चालू,असे ठराऊन स्वातंत्र्याचा लढा दिला.तो जिंकला आणि हुकुमशाही संपहून लोकशाही प्रस्थापित केली.
पण लोकशाहीचे भवितव्य हे लोकप्रतिनिधींच्या स्वार्थावर अवलंबून आहे. मतदारांनी जर स्वार्थी लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांना निवडून दिले तर परत हुकुमशाही येणार हे नक्कीच.केवळ संपत्तीवर डोळा ठेवणारे लोक जर सत्तेत गेले तर ते सत्तेच्या माध्यमातून भरपूर पैसा संपती जमवतील ,आणि संपत्तीच्या जोरावर हुकुमशाही प्रस्थापित करतील.केवळ पैसे कमावण्याचे माध्यम किंवा साधन म्हणून जर काही लोकांना सत्ता हवी असेल तर लोकशाहीला त्यांचे पासून धोकाच आहे,असे समजावे.
जे नेते जनतेचा देशाचा आपल्या मतदार संघाच्या विकासाचे विचार न करता,स्वतःचाच विचार करतात.किंवा आपल्या मतदार संघाच्या विकास योजनेतून भरपूर पैसे कमावतात.हप्ते घेतात,हप्ते घेणे,वसूल करणे हाच त्यांचा इंटरेस्ट असेल तर असे लोक हुकूमशाही ले पूरकच ठरतात.म्हनुन प्रजासत्ताक टिकवायचे असेल,तर अशा स्वार्थी लोकांना जनतेनी मतदारांनी निवडून देऊ नये.सत्ता म्हणजे पैसे कमावण्याचे साधन नसून सत्ता हे सेवेचे साधन आहे,अशा विचाराच्या प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे,तरच लोकशाही टिकेल.अन्यथा हुकुमशाही परत येईल.
लोकशाहीतील जनता कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता काम नये.मतदानाचे महत्त्व माहीत झाले पाहिजे.एक मत कमी किंवा जास्ती ने आमदार खासदार मुख्यमंत्री प्रधानमंत्री निवडून येतो,किंवा पडतो, एव्हढे महत्त्व एव्हडी ताकद एका मतात आहे,याची जाणीव मतदारास असली पाहिजे.माझे मत हाच माझा विकास,हे जो पर्यंत मतदाराच्या लक्षात येत नाही,तो पर्यंत लोकशाही बळकट होणार नाही.जो पर्यंत मतदार दारू मटण पैसा नोकरी या प्रलोभन ले भुलून मत देणार तो पर्यंत प्रजासत्ताक तळ्यात मळ्यात असणार आहे.
आपली लोकशाही ही अमेरिका सारखी प्रत्यक्ष लोकशाही नसून लोकप्रतिनिधींच्या मार्फत सत्ता स्थापन करण्याची लोकशाही आहे.म्हणून सत्तेत कोण बसायचे ते जनता ठरवीत नसते,सरकार ( मंत्रिमंडळ ) बनविण्याचे काम मतदार जनता करीत नाही,तर मंत्री मंडळ हे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री बनवीत असतो.निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे सभागृहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री निवडतात.आणि मुख्यमंत्री पंतप्रधान हा मंत्रिमंडळ म्हणजे सरकार बनवीत असतो आणि हे मंत्रिमंडळ दर आठवड्याला मीटिंगमध्ये जी आर पास करून त्यास सभागृहाची मंजुरी घेत असतात.असा हा कारभार म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाहीचा कारभार चालतो.
निवडून जाणारा नेता पुढारी हा समाजवादी विचाराचा आहे,की स्वार्थी हुकुमशाही विचाराचा आहे,हे पाहूनच मतदारांनी मतदान केले पाहिजे,अन्यथा स्वार्थी लोक हे हुकुमशाही प्रवृत्तीचे असतात,म्हणून ते हुकूमशाहीवादी असतात.असे लोकप्रतिनिधी लोकशाहीचे दुस्मन असतात.म्हणून अशा लोकांना निवडून देता कामा नये.लोकशाही विरोधक जर सत्तेत जाऊन बसले तर हुकुमशाही पुन्हा डोके वर काढते.आणि चोर पावलांनी हुकुमशाही परत येते.
हा हुकुमशाहीचं धोका टाळायाचा असेल आणि लोकसत्ताक कायम करायचे असेल तर समाजवादी आणि सेवाभावी आणि पुरोगामी विचारांचे लोकच सत्तेत पाठविले पाहिजेत.अशाच लोकांना निवडून दिले पाहिजे.जात्यांध धर्मांध,भांडवलवादी विचारांच्या लोकांना निवडून दिले तर ते लोकशाहीला धोकादायक ठरेल.
या सर्व गोष्टींचे स्मरण व्हावे, यासाठीच दरवर्षी प्रजासत्ताक साजरा करण्याचा उद्देश आहे.