रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील अडेगावं देश येथील पुलाला लागून असलेल्या रस्त्यावर आज दिनांक 25 जानेवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ट्रक उलटल्याची घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही यात चालक व क्लिनर थोडक्यात बचावले आहे.
सविस्तर वृत्त असे की वरोरा येथून एका खाजगी रिसार्ट वर सिमेंटच्या विटाने भरलेला ट्रक क्रमांक एमएच ३४- एबि ४३३५ हा खाजगी रिसर्ट वर विटा खाली करून वरोरा येथे जात होता.
ट्रक चालकाला ट्रक वरून नियंत्रण सुटल्याने भरधाव जाणारा ट्रक रस्ताच्या कडेला शेतात उलटला. यात ट्रक चालक नाव खुशाल साळवे वरोरा, तर जखमी मजुराचे नामें मुन्ना दशमा (मध्यप्रदेश) तेज दशमा (मध्यप्रदेश) हे जखमी झाले आहे.
दरम्यान विहीरगाव येथील वाघाच्या हल्यात बंदोबस्त करिता आलेल्या पोलीस विभागाला याची माहिती मिळताच तात्काळ घटना स्थळी दाखल होऊन जेसीबी द्वारे ट्रक ला वर उचलून दबून असलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात पोलीसना यश आले. असून जखमींना उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे दाखल केले आहे.