रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील विहीरगांव येथील दयाराम लक्क्षण गोंडाणे वय – 60 वर्ष हे आज दिनांक 25 जानेवारीला 11 वाजताच्या दरम्यान पळसगाव वनपरीक्षेञात बिट क्रमांक 858 दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे.
सवीस्तर वृत्त असे आहे की , विहीरगांव येथे आडीपाडीने गुरे राखण्याची प्रथा आहे.चार -पाच गुराखी 10 वाजता 858या पळसगाव वनपरीक्षेञात गुरे राखण्यासाठी जात असतात 11 वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने दयाराम लक्ष्मण गोंडाणे वय -60 वर्ष या गुराख्यावर हल्ला करून जागीच ठार केले असून याची माहिती जाणीक धाडसे शेळ्या राखणाऱ्या व्यक्तीने वीहीरगांव येथील गावकऱ्याला व वन विभागाला येथे फोन करून दिली वन विभागाने घटनेचा पंचनामा करून शववीच्छेदनासाठी उपजील्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले.
यावेळी पळसगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. योगिता आत्राम, श्री.अमोल कवासे क्षेत्र सहाय्यक मदनापुर ,श्री किनाके,निखुरे वनपाल , वनरक्षक श्री. नागलोत,मेश्राम, जिवतोडे,जरारे,गेडाम, दुधे,खारडे आणि इतर कर्मचारी उपस्थीत होते.
यादरम्यान मृतक दयाराम लक्ष्मण गोंडाणे यांच्या कुटुंबींयाना तात्काळ वन विभागाने 50 हजाराची आर्थिक मदत करण्यात आली या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे