लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन… — गांधी चौक, चंद्रपूर येथे राष्ट्रीय मतदार दिनी निदर्शने…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

चंद्रपूर :- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने गांधी चौक येथे 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलन करण्यात आले.

            या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

              निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळावी, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. 

           यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, के.के. सिंग, सुभाष सिंग गौर, युसुफ भाई सिद्दिकी, अंबिकाप्रसाद दवे यांच्यासह युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदाताई धोबे, महिला शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, प्रशांत दानव, प्रदीप डे, संतोष लहामगे, ललिता रेवल्लीवार, सुनीता अग्रवाल, सुनिता लोढीया, संगीता भोयर, शिवा राव, भालचंद्र दानव, मतीन कुरेशी, राहुल चौधरी, सागर खोब्रागडे, प्रसन्ना शिरवार, रामकृष्ण कोंदरा, तवंगर खान, पप्पू सिद्धकी, नौशाद शेख, शिरीष गोगलवार, दुर्गेश कोडाम, गोपाल अमृतकर, प्रशांत भारती, शाबिर सिद्दिकी, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.