उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
प्राध्यापक महेश पाणसे कुशल संघटक असून कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व आहेत.त्यांचे संवेदनशील मन सातत्याने समाजहितोपयोगी कार्यात व्यस्त असतय.त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल पत्रकार संघाचे संस्थापक राज्य संघटक संजय भोकरे यांनी घेतली आणि प्रा.महेश पाणसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची सुचना राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना केली.
राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेला विशेष महत्व देत राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी प्रा.महेश पाणसे यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
प्रा.महेश पाणसे यांनी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांच्याकडे विदर्भ विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी राज्याध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली होती.
प्रा.महेश पाणसे यांच्याकडे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी असताना सर्वप्रथम चिमूरला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अधिवेशन घेण्यात आले होते.
प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालीन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी,आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने तथा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने,”जिल्हा अधिवेशन,यशस्वी ठरवले होते.
तद्वनंतर प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे,”विदर्भ स्तरिय अधिवेशन,घेण्यात आले होते.ब्रम्हपूरीचे अधिवेशन सुध्दा तालुका पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने यशस्वी ठरले होते.
तद्वतच प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात गोरगरीब जनतेला व रुग्णांना जिवनावश्यक मदत,पुर्व विदर्भात करण्यात आली होती.याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले होते.समाजहितोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते.
तद्वतच नागपूरला सुध्दा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते.
पुर्व विदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची यशस्वी बांधणी करून प्रभावी व परिणामकारक शक्ती प्रा.महेश पाणसे यांनी उभी केली हे त्यांचे उल्लेखनीय कर्तव्य ठरले आहे.
प्रा.महेश पाणसे म्हणजे एक कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व आहे.अशा व्यक्तीमत्वाची राज्य संघटक संजय भोकरे यांनी दखल घेणे म्हणजे न्याय पुर्वक सन्मान करणे होय आणि विस्तारक कार्यासाठी सन्मानपूर्वक संधी देणे होय.
प्रा.महेश पाणसे यांनी पत्रकार संघाचे वाढीसाठी आणि ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे,अशाप्रकारची अपेक्षा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केली आहे.
प्रा.महेश पाणसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी झालेली नियुक्ती,पत्रकार संघातंर्गत त्यांच्या अथक परिश्रमाचा व महत्त्वपूर्ण कार्याचा सन्मानच आहे.
“प्रा.महेश पाणसे साहेबांचे,दखल न्यूज भारत मुख्य संपादक,मुख्य कार्यकारी संपादक,वृत्त संपादक,संपादक,कार्यकारी संपादक,उपसंपादक,विशेष विभागीय प्रतिनिधी,विशेष प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,ग्रामीण प्रतिनिधी आणि चिमूर तालुका पत्रकार संघाद्वारे,”मनःपुर्वक अभिनंदन!