उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुक्यातील एच पी गॅस धारकांच्या घरी काही लोक जाऊन गॅस तपासणी करून गॅस पाईप लावून देत आहे. परंतु एच पी गॅस कंपनी ने अशी कोणतीही एजन्सी नेमली नाही. त्यामुळे एच पी गॅस धारकांची लूट होऊन फसवणूक होत असल्याचा प्रकार निदर्शनास आले आहे. या प्रकाराची दखल प्रियंका एच पी गॅस चिमूरचे मनिष तुंम्पलीवार यांनी घेतली असून फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहाण्याचे आवाहन केले आहे.
स्फ़ोट मुक्त भारत अभियानाच्या नावा खाली प्रचार करीत काही महिला, पुरुष गॅस धारकांच्या घरी जाऊन गॅस ची तपासणी करीत पाईप खराब झाल्याची बतावणी करून नवीन पाईप लावा आणि स्फ़ोट पासून मुक्त रहा असा सल्ला देत आहे.
बाजार पेठेत गॅस पाईप १७० रू असताना फसवणूक लूट करीत १००० रू. घेत आहे.यात ग्रामीण भागातील एच पी गॅस धारकांची लूट होत आहे.
फसवणूक करणाऱ्याची टोळी चिमूर तालुक्यातील गावात घरोघरी जाऊन फिरत आहे. एच पी गॅस धारक यांनी गॅस ची तक्रार असल्यास स्वतः प्रियंका एच पी गॅस चिमूर येथे संपर्क करावा आणि फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहाण्याचे आवाहन प्रियंका एच पी गॅस एजन्सी चिमूर चे मनिष तुंम्पलीवार यांनी केली आहे.