शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भद्रावती दिनांक २४ :-
चंद्रपूर फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा महिला सन्मान व महिला सुरक्षा या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विचारमंचावर फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड विजय मोगरे, प्रमुख अतिथी संजय पवार, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, चंद्रपूर, पल्लवी तोडासे, सरपंच बोर्डा, पांडव, ग्रामपंचायत सदस्य बोर्डा, प्रमोद डोर्लीकर, शाळा समिती अध्यक्ष, प्रशांत कातकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा, गौतम सागोरे माजी शाळा समिती अध्यक्ष बोर्डा, आत्माराम तावाडे माझी पोलिस पाटील बोर्डा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेश चिमनकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राजेंद्र बारसागडे, प्रा.डॉ.मेघमाला मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा.अशोक बनसोड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी विद्यापीठ गीत व स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड विजय मोगरे यांनी समारोप प्रसंगी रासेयो विभाग व्दारा आयोजित शिबीरा मध्ये सुप्त कलागुणांना आविष्कृत करण्याची संधी प्राप्त करून देते व विद्यार्थिनीच्या व्यक्तीमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे विचार व्यक्त केले.
प्रमुख अतिथी संजय पवार यांनी वाचन व संवादकौशल्य याकडे आजच्या युवा पिढीने लक्ष देऊन सकारात्मक विचार करावा असे मौलिक विचार व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अँड विजय मोगरे यांच्या हस्ते निमंत्रित मान्यवराचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शिबीरामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कु.खूशी शर्मा, दिव्या खांडकुरे, दिव्या वाघमारे,आरती चिटलवार, सरोज देवगडे,गौरी बोबडे, मित्तल कांबळे या रासेयो स्वंयसेवीकाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेश चिमनकर यांनी केले.
सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मेघमाला मेश्राम तर आभार डॉ.राजेंद्र बारसागडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व शिबीरार्थी विद्यार्थिनीची उपस्थिती होती.