प्रधानमंत्री आवास योजनेपासून आंबोली वासियांना मागील चार वर्षांपासून का म्हणून वगळले? — आमदार किर्तीकुमार भांगडीया,चंद्रपूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार काय?

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा आंबोली येथील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेपासून वगळले असून,त्याचे मुळ कारण संबंधित अधिकाऱ्यांद्वारे पुढे आले नसल्याची खदखद तेथील नागरिकांना आहे.

      आंबोली गावातील पंतप्रधान आवास योजना प्रपत्र ड मधील घरकुलाची यादी रिजेक्ट झाली.तसेच हा प्रश्न फक्त आंबोली गावापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या हक्कांचा प्रश्न आहे.हा शासन-प्रशासनाकडून न सुटलेला महत्वाचा प्रश्न आहे. 

       सदर यादी पूर्वरत करण्यासाठी ग्राम पंचायत आंबोलीचे पदाधिकारी गेल्या 4 वर्षांपासून प्रशासनाला,आमदार,खासदार यांना निवेदन देत आहे,पत्रव्यवहार करत आहे.

      परंतु प्रधानमंत्री घरकुल योजनेबाबतचा गोरगरीब लोकांशी संबंधित असलेला हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

       आजही आंबोली गावातील गोरगरीब SC, ST, OBC आणि NT लोकांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.कित्येक लोकांची घरे पडण्याच्या मार्गावर आहेत.आणि पावसाळ्यात तर आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे.

       यामुळे आंबोली वासियांच्या प्रधानमंत्री आवास योजना समस्यांकडे आमदार किर्तीकुमार भांगडीया केव्हा लक्ष देणार?