
बाळासाहेब सुतार
तालुका प्रतिनिधी इंदापूर
— शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण प्रयोग करून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी वापर करावा,क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे…..
शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल,असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असेही ते म्हणाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025’ च्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे,उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव,उपसभापती मनोहर ढुके,आजी,माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
ॲड.कोकाटे म्हणाले,राज्यातील शेतकरी प्रगतशील आहेत.शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान,उत्कृष्ट बी-बियाण्याचा वापर केला पाहिजे.कृषी क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरीता राज्य शासनावतीने सहकार्य करण्यात येईल.
केंद्र व राज्यशासन मिळून शेतकरी सुरक्षित आणि संरक्षित होण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध लोकल्याणकारी निर्णय घेण्यात येतील.आगामी काळात नवीन योजना राबविण्यासोबतच आवश्यकतेनुसार जुने कायदे व योजनेतही बदल करण्यात येतील.
तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे.प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान,तापमान आदी घटकांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे.
कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025 च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान,पीकपद्धती तसेच कृषी क्षेत्रातील ज्ञान गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता प्रयत्न करण्यात आला आहे.
आगामी काळात अशा प्रकारचे प्रदर्शन राज्यभर आयोजित करण्याकरीता प्रयत्न करण्यात येतील.केवळ महिलांकरीता अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करुन कृषी विषयक ज्ञान,नवीन तंत्रज्ञान,अत्याधुनिक पीकपद्धती आदींबाबत माहिती देण्यात येईल.
उमेद अभियान तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादन विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,असेही ॲड.कोकाटे म्हणाले.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे बोलत असताना म्हणाले की शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करावा,नियोजनबद्ध पद्धतीने आधुनिकतेची माहिती घेऊन शेती करावी.शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करुन कमीत कमी खर्चात अधिक अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
बाजारपेठेत पिकांचे नवनवीन वाणदेखील उपलब्ध असून त्याचाही वापर करावा.कृषी विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.इंदापूर तालुक्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेतात.कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासोबत विविध स्पर्धेत सहभागी होतात.
आगामी काळात शेतीला चांगले दिवस आणण्याकरीता धोरण आणावे,कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दत्तात्रय भरणे यांचे उद्गार आहेत..
पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे बोलत असताना म्हणाले की प्रत्येक वर्षी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी प्रदर्शन हे घेत असतो,कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून शेतीचे उत्पादन कशाप्रकारे वाढवायचे याबद्दल अधिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती मिळते,अनेक पशु पक्षी जनावरे घोडेबाजार वेगवेगळे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातील सर्व माहिती या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मिळत असते,
इंदापूर येथे 22 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित प्रदर्शानात कृषी व जनावरे,घोडेबाजार व डॉग शो आहेत.त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला अधिक अधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी या वेळी केले.
कार्यक्रमात ॲड.कोकाटे यांच्या हस्ते तालुक्यातील शैक्षणिक,कृषी,उद्योग आदी या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी उद्घाटन प्रसंगी आलेले मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.