1949 मधील संविधानसभेतील सदस्यांनो आम्हाला क्षमा करा…..
तुम्ही जसे आम्हाला समजलात तसे आम्ही निपजलो नाही.तुम्ही आमच्याविषयी उगीचच गैरसमज करुन बसलात…
तुम्ही आम्हाला आमच्या मताच्या अधिकारातून जागृत होऊन स्वतःची अस्मिता आणि लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्याच भल्यासाठी सोपवली होती.
तुम्ही आमच्या देशात न्याय हक्काच्या विरुद्ध आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून लढून मूलभूत हक्काचे संरक्षण करणार अशी अपेक्षा व्यक्त केली होती.परंतू आम्ही मात्र तुमच्या सर्व अपेक्षा फोल ठरविल्या….
केवळ पोपटपंची सारखं शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तोंडून आम्ही भारताचे लोकं……..
वदवून घेण्यात 75 वर्षे घातली.परंतू ,त्याचा अर्थ आणि जागृतीपर्यंत मजल कधी आमच्या शिक्षकांनी मारलीच नाही.
याचे दुष्परिणाम आज 2024 / 25 च्या काळात आम्हाला भोगावे लागत आहे….!
देशातील राजकारण लोकशाहीच्या नावावर तर पार नैतिकतेच्या रसातळाला गेले आहे.
मुख्यमंत्रीपदी राहिलेला नेता ईडी,सी.बी.आय.च्या धाकाने किंवा लाचारीने मंत्रीपदासाठी सुद्धा हलकट होऊन त्या हलकटांच्या रांगेत ताट घेऊन उभा राहतो.
येथील सर्व व्यवस्था ( संविधानिक संस्था ) जनतेवर अर्थात देशावर कितीही कर्ज होऊन जनतेला भिकेला लावलं तरी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाना गोदमध्ये घेऊन त्यांनाही लाचार करुन ” पत्रकारीतेला ” संपुष्टात आणण्याचे काम करते.
एके काळी जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही आणि संविधान असलेला भारत देश 2014 पासून मात्र मोदी – शहा प्रायव्हेट लिमिटेड झालेला दिसतोय….
आम्ही इंग्रजानाच ते जाऊन 75 वर्षे झाली तरी त्यांनाच दोष देतोय…..
परंतू,पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी बाहेरून आलेल्या आर्यानी आपल्या कुसंस्कृती द्वारे आजपर्यंत आम्हाला मानसिक गुलाम बनविले त्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करतो.
जर आमचा देश कोणत्याही अवस्थेत जाऊन संपला,किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध लादून नाचक्की झालीच तर त्या सर्व परिणामांना भोगण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असू…
कारण,आमच्या क्रांतिकारक पूर्वजांनी जेजे आमच्याच कल्याणासाठी क्रांत्या केल्या.त्यांचे आम्हाला स्वार्थापलीकडे काहीही घेणे देणे नाही.म्हणून या देशातील राजकारण्यांनी आम्हाला कसेही वागविले तरी आम्ही त्यांच्याच उपकारावर जगण्याचे निश्चित केलेले असल्यामुळे आम्हाला आमच्या लेकरांचे,नातवंडांचे काहीही घेणे देणे नाही.
उलट आम्हाला कुणी येणाऱ्या पिढीचे खुनी आणि गुन्हेगार म्हटले तरी हरकत नाही….
याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही…..
कारण……
वेगवेगळ्या धर्माच्या मानसिक कर्मकांडाच्या गुलामीच्या आंधळ्या श्रद्धेतून येणारी मजा इतर कोणत्याही स्रोतातून येतच नसेल तर आम्ही त्या विचारसरणीचा काय म्हणून स्वीकार करावा?
आता तर सदविचारी स्वतःला समजणाऱ्या बौद्ध धम्म सुद्धा आज धर्म होताना दिसत आहे.धम्म आणि धर्म यात फरकच राहिलेला नाही.सर्व भगवे रंग आता सारखेच झालेत. केवळ केस असणे आणि नसणे एवढाच काय तो फरक राहिलेला आहे!
म्हणून लोकशाही,संविधान,देश,मानवता,संस्कृती या गोष्टींचा कुणीही विचार न करता जगणे हाच भारतीयांचा नवीन धर्म असला पाहिजे…
तेंव्हाच आम्ही…….
“मेरा भारत गहाण”
गर्वाने म्हणू…….!!
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689…