विद्युत मीटर रीडर व बिल वाटप कंत्राटी कामगारांचा विविध मागण्यासाठी काम बंदचा इशारा…

युवराज डोंगरे /खल्लार 

        उपसंपादक

            महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून मीटर रीडिंग व बिल वाटपाचे काम एम एस ई डी सी एल मीटर रीडिंगचे काम केल्या जाते. हे काम कंत्राटी पद्धतीवर केल्या जात असून त्यांच्या मागण्याची पूर्तता महावितरणने पूर्ण केली नसल्यामुळे कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने 22 जानेवारी 25 रोजी उपकार्यकारी अभियंता दर्यापूर यांना निवेदन देऊन विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या अन्यथा 1 फेब्रुवारी 25 पासून काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

              महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटर रीडिंग व बिल वाटपाचे काम केल्या जाते शासनाने प्रीपेड मीटर बसविल्याचे काम हाती घेतल्याने येत्या काळा त या कामगारावर बेरोजगाराचे वेळ येणार आहे. त्याकरिता वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वती व इतर मागण्या करिता हिवाळी अधिवेशनात ऊर्जा सचिव यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करत प्रश्न निकाले काढू अशी आश्वासित केले होते मात्र यावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्यामुळे वरीष्ठाना निवेदन देऊन कंत्राटी कामगारांनी आपल्या विरोध दर्शवीत काम बंद करण्याचा इशारा दिला.

         याप्रसंगी मोहन वानखडे, शिवराज सिंग चव्हाण, जोगेंद्र पिंपळे, सौराज गणेश सुरज परिहार,ऋषिकेश काकडे, निखिल राऊत,प्रकाश नवले,पंकज कैकाडी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.