
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अडगाव नबापूर शेत शिवारात अंकुश रंगराव सरदार वय 32 वर्ष रा.अडगाव खाडे या युवकाचा उमेश हेंड यांच्या शेतात तुर हळंबा कटर मशीनवर काम करत असताना कटर मशीन मध्ये जावून शेतकरी मजूर अंकुश सरदार यांचा मशीन मध्ये अटकुन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुःखद घटना (22) ला दुपारच्या सुमारास घडली.
यामध्ये युवकाचा एक पाय आणि कंबर यांचे तुकडे झाले.राहुल चंद्रशेखर घिये यांची हळंबा कटर मशीन वर मजुरी करून युवक त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे त्यांच्या मागे दोन लहान मुले व पत्नी आहे.
बातमी लिहिस्तोवर पोलिसांचा पंचनामा सुरू होता.