संविधानविरोधी शक्तीला,लोकशाहीवादी भारताला हिंदूराष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला युरोपियन राष्ट्राची खिळ…

         नवीन वर्षांच्या प्रारंभी युरोपीयन राष्ट्रांनी आमच्या प्रधानमंत्री मोदी – शहा यांना हिटलरच्या चष्म्यातून पाहण्यास सूरुवात केली.

            ज्याप्रमाणे सुरुवातीला हिटलरला तत्कालीन दोस्तराष्ट्रानी दुर्लक्षित केले.नंतर मात्र त्याचा वारू रोखण्यासाठी अमेरिकेला पुढाकार घेऊन “मॅनहॅटन प्रोजेक्ट ” राबवून अणुबॉम्बची निर्मिती करुन हिटलरला थांबवावं लागलं.

         अगदी अशाच काहींशा इतिहासाची सुरुवात झाल्याची चिन्हे दिसत असल्याचे युरोपीयन राष्ट्राना वाटत असल्यामुळेच त्यांनी एका सुरात भारतीय लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे अशी गंभीर दखल घेतली.

          याला दुजोरा देताना त्यांनी कांही उदाहरणे पण दिली.त्यामध्ये गेल्या सहाशे दिवसापासून जळत असलेले मणिपूर,तिथे अजूनही प्रधानमंत्री यांनी पाय सुद्धा ठेवला नाही.

          तसेच प्रसार माध्यमाची मुस्कटदाबी, अल्पसंख्यांकांवर बहुसंख्यांकाकडून होणारे अत्याचार,स्त्रियांवर होणारे अत्याचार,जगाने लाथाडलेल्या EVM वरच जनतेचा विरोध असतांना निवडणुका घेण्याचा सरकारचा अट्टाहास,हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविणे. मानवी हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांना पाठीशी घालणे.अशा अनेक कारणांमुळे आपल्या देशावर भविष्यात आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       त्यासाठी संविधानवाद्यानी आपल्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी संविधानिक मूल्य समजून घेऊन त्याचे संरक्षण कसे करता येईल याविषयीची जागृती करणे आवश्यक आहे.

    तरच आम्ही आमच्या देशाचे आणि स्वतःचे संरक्षण करू शकू…

आवाहनकर्ता आणि संविधान जागृतीचा कृतिशील लेखक…

     अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, 7875452689…