
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- रा.प. गडचिरोली विभाग व रा.प. गडचिरोली आगार यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ‘सुरक्षितता अभियान सन २०२५’ अंतर्गत उद्घाटनाचा कार्यक्रम आगार कार्यशाळा परिसरात पार पाडण्यात आला.
सदर कार्यक्रमास अशोककुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, रा.प. गडचिरोली, लोखंडे , सुरक्षा व दक्षता अधिकारी, रा. प. गडचिरोली, अनंता धारणे, विभागिय सांख्यिकी अधिकारी, रा. प. गडचिरोली उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाल्गुन राखडे, आगार व्यवस्थापक, रा. प. गडचिरोली यांनी केले. लोखंडे , सुरक्षा व दक्षता अधिकरी यांनी सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी नियमावली सांगितली तसेच अपघात होउ नये यासाठी दक्षता कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. अनंता धारणे यांनी सुरक्षिततेबाबत योग्य व मोलाचे मार्गदर्शन केले.
अशोककुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक यांनी प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत विश्वास वृद्धीगत करणे, रा.प. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणिव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालुन दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे व रा.प. वाहनांना अपघात होणार नाहीत यासाठी नेहमी योग्य ती काळजी घेण्याबाबत सुचना दिल्या व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवि बुर्ले, वाहतुक नियंत्रक व आभार प्रदर्शन धनराज मोहले, वाहतुक नियंत्रक यांनी केले. सदर कार्यक्रमाला विभागीय कार्यालय आणि आगारातील अधिकारी, उपस्थित होते.