
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ जिल्हाध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्या भावना संजय बावनकर यांचा वाढदिवस राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय वडाळा चिमूर येथे मूकबधिर विद्यार्थासोबत साजरा केला.
या कार्यक्रमाकरीता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्यध्यक्ष श्याम लेडे.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात वृक्षारोपण करूण करण्यात आली या कार्यक्रमात भावना संजय बावनकर यांनी विद्यार्थी तथा उपस्थित सर्व मान्यवरांना केक व नाश्ता दिला तसेच विद्यार्थ्यांना स्कूलबँगचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मूकबधिर विद्यार्थी आनंदित आणि खूप उत्साहीत झाले होते.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे,ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते,ओबीसी महिला महासंघाच्या तालुका अध्यक्षा यामिनी कामडी,ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुका अध्यक्ष कवडू लोहकर,धर्मदास पानसे,प्रदीप कामडी,विलास पिसे,संजय बावनकर,मीना चौधरी,मीनाक्षी बंडे,पुष्पा हरणे,प्रमिला ठाकरे,पटवारी कोपहरे,ताराचंद बोरकुटे,अशोक विभुते,श्रुती मून,चंद्रभागा वांढरे,दीपक पंधरे,सर्व राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.