रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चंद्रपूर शहरांतर्गत स्वावलंबी नगरातील मैदानावर १७ ते १९ जानेवारीच्या कालावधीत सौभाग्यवती महिला क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत डॉक्टर महिला संघ विजेता ठरला.तर,आझाद गार्डन महिला संघाने उपविजेते पदक पटकावले.
या स्पर्धेत जिल्हा भरातील विविध महिला संघांनी सहभाग घेतला होता.रविवारी (ता. १९) अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
राज्याचे माजी वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यविकासमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपचे महानगराध्यक्ष तथा माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या पुढाकारातून महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
स्पर्धा आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.महिलांचे क्रिकेट सामने बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
स्पर्धेचा अंतिम सामना डॉक्टर महिला संघ आणि आझाद गार्डन संघात झाला.यात डॉक्टर महिला संघ विजेता ठरला.
यानंतर आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाला भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,विवेक बोढे,संजय बुरघाटे,माजी नगरसेविका सविता कांबळे,वंदना तिखे, सचिन कोतपल्लीवार,संदिप आगलावे,चाद सय्यद,महेश बोडके,अजय रणदिवे,संजय बुरघाटे,प्रमोद पुण्यपवार,अभय बनपूरकर,डॉ.डांगेवार मॅडम,विजय पावडे,शास्त्रकार,इगोले ताई,आदींची उपस्थिती होती.
यावेळी राहुल पावडे यांनी,या स्पर्धांच्या माध्यमातून महिला खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा येत्या काळातही घेण्यात येतील,असे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेता संघाला रोख रक्कम,स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिनेश येरणे यांचेकडून,द्वितीय २१ हजार रुपयांचे पारितोषिक संजय बुरघाटे यांचेकडून,तर तृतीय ११ हजार रुपयांचे बक्षीस श्री.महर्षी विद्यामंदिरचे गिरीश चांडक यांच्याकडून प्रायोजित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता अशोक जीवतोडे,विवेक बोढे,संजय ढवस,अशोक हासानी,कुंजबिहारी परमार, सुरेश बंडीवार,प्रमोद पुण्यपवार,सचिन कोतपल्लीवार,चांद सय्यद,अजय रणदिवे,महेश बोडके,सुनील डोंगरे,रोहित मुरगकर,राजू वानखेडे,राजेंद्र जुमडे यांचे सहकार्य लाभले.राहुल पावडे मित्रपरिवारातील सदस्यांनी स्पर्धा आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
******
कोट..
प्रत्येकामध्ये कलागुण असतात. मात्र,अनेकांना कलागुण प्रदर्शित करण्याची संधी मिळत नाही.तर,अनेकजण कामाच्या व्यस्ततेत त्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा.
त्यांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून सौभाग्यवती महिला क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित केला जात आहे.यापुढेही अशा स्पर्धांचे आयोजन केले जाईल.