
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातील नेरी येथील पिएचसी चौकातील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविलेले योग्य आहे.अशी चर्चा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगु लागली आहे.
गावाचा विकास व्हावा विकासाच्या शासकीय योजना राबविण्याचा नेरी ग्रामपंचायत प्रयत्न करित असताना त्या जागेवर अतिक्रमण करून अतिक्रमण धारक वातावरण निर्माण करित आहे.
किशोर उकुंडे माजी ग्रामपंचायत सदस्य आज एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, हे अतिक्रमण माझ्या भावाचे आहे. बौद्ध समाजाचे लोक आले आणि त्यांनी नूकसान केले, शिवीगाळ केले हे उकुंडेचे बोलने चर्चेचा विषय झाला आहे.
सदरील कार्यवाही ही ग्रामपंचायतने केली आहे परंतु उकुंडे यांनी बौद्ध समाजाचा उल्लेख करुन सामाजिक वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न करित आहे.
अतिक्रमण धारक माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतने निर्धारित केलेल्या जागेवर पदाचा वापर करून लाभ घेवु शकतो का? किंवा अतिक्रमण करु शकतो का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
किशोर उकुंडेचे व त्यांच्या परिवारजनांचे कोठे कोठे अतिक्रमण आहे, त्याचा कर भरणा करीत आहे का? याबाबत चौकशी व्हावी असे जानकारामध्ये बोलले जात आहे.
जर कर भरणा करीत नसेल तर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करने योग्य आहे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाची जेव्हा योजना आली तेंव्हा गावागावांमध्ये संविधान सभागृहाच्या निर्मितीसाठी निधी ची घोषणा केली. तेव्हा नेरी ग्रामपंचायतनी ही जागा संविधान सभागृहाच्या बांधकामासाठी निर्धारित केलेली आहे.तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.तसा फलक त्या जागेवर ग्रामपंचायतकडुन लावण्यात आला आहे.
असे असताना गैर यांनी त्या जागेवर आक्रमण करून मनमानी कारभार का म्हणून करावा असा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिक्रमण करण्यामागे उकुंडेचा संविधान सभागृह होवु नये असा उद्देश आहे.अतिक्रमण धारक यांचा संविधान व संविधान सभागृहाचे बांधकाम होवु नये याला विरोध आहे अशी चर्चा आहे.
सार्वजनिक जागेवर अतिक्रमण आहे हे खरे आहे आणि ते अतिक्रमण ग्रामपंचायतने हटविले हेही योग्य आहे आणि खरे आहे अशी चर्चा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगु लागली आहे.