ट्रॅक्टर वरून पडल्याने युवकाचा मृत्यू.. — चिमूर तालुकातंर्गत मौजा सावरगाव येथील घटना,परत रेती चोरीचा ठरलाय तिसरा बळी… — चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा आणि चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन जातीने लक्ष देणार काय?…

बिग ब्रेकिंग न्यूज…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

    चिमूर तालुक्यातील सावरगाव गावाजवळ पहाटे 5 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर पलटून हमाल मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर आहे.

          मौजा सावरगाव येथील सचिन बापूराव मेश्राम वय 30 वर्षे या युवकाचा ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला सदर युवक रेतीच्या ट्रकटरवर हमालाचे काम करीत होता.

           रात्रीच्या अंधारात रेतीची चोरी करून तस्करी करण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.आज दि 16 जानेवारी च्या पहाटे सावरगाव येथे रेती टाकून,विना नंबरचे ट्रॅक्टर नेरी कडे परत भरधाव जात असताना सावरगाव समोरील छोट्या मोडिवर शेतात ट्रॅक्टर पलटल्याने मजूर गाडीच्या खाली दबल्याने मृत्यू झाला.

       सदर ट्रॅक्टर नेरी येथील अनिकेत जांभुळे यांच्या मालकीचा असून ट्रॅक्टर विना नंबरचा वापण्यात आला आहे.

        सदरची घटना तपासात असून ट्रक्टरटाली मालकावर व चालकावर काय कारवाई होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

          ट्रॅक्टरने रेती तस्करी अंतर्गत जीव गमावण्याची ही चिमूर तालुक्यातील तसरी घटना आहे.या अगोदर खडसंगी परिसरात ट्रकटर वरून पडल्याने तरुणांचा बळी गेला होता.त्यानंतर शिवनपायली येथील युवकांनी सुध्दा जीव गमावला आहे.

       मात्र एवढी मोठी घटना होऊन ही महसूल विभाग रेती तस्करीवर अंकुश लावू शकत नाही हे ही मोठी शोकांतिका आहे.

       त्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेतीतस्कर पुन्हा किती बळी घेतील,हे सांगता येत नाही.तरुण युवकाचा बळी गेल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

      सदर घटनेने पुन्हा एकदा रेती तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महसूल विभाग आणि पोलीस विभाग आता कोणती भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..

      मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच ट्रकटर जप्त करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

        चिमूर तालुकातंर्गत अवैध वाळूचे उत्खनन जोरात सुरु आहे,मात्र सदर अवैध वाळू उत्खननाकडे चिमूर उपविभागीय अधिकारी,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी,चिमूर तहसीलदार,चिमूर ठाणेदार दुर्लक्ष करीत असल्याने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा व चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे जातीने लक्ष केंद्रित करतील काय?हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतो आहे.