
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
घुग्घूस – शहर ते मातारदेवी तडाली पर्यंत चौपदरी महामार्गाचे निर्माण करण्यात आलेले आहे.
या महामार्गाच्या मधोमध महावितरण कंपनीचे विद्युत खांब (पोल ) उभे असून या खांबामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी चारचाकी वाहन धारकांचा अपघात झालेला आहे.
यापोलची दखल घेऊन सदर पोल हटवून मार्ग मोकळा करावा याकरिता शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी मुख्य अभियंता यांना दिनांक 05/10/2024 रोजी निवेदन देऊन कारवाई करण्यासाठी सुचविले होते.
मात्र सदर प्रकरणात कुठलीच कारवाई न झाल्याने आज दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी राजूरेड्डी यांनी मुख्य अभियंता भटारकार घटनास्थळी बोलावून त्यांचा चांगलाच समाचार घेतला व येत्या आठवड्यात सदर पोल न हटल्यास याविद्युत पोलमुळे कुठल्याही नागरिकांचा अपघात झाल्यास मुख्य अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, सुनील पाटील, शहशाह शेख, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.