शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजीक जाणिवा जपल्या पाहीजे,:- गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार भिमराज पात्रीकर यांचे आवाहन…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली –

दि. 21 मे 2023 रोजी फुले दाम्पत्य प्रतिष्ठाण आयटीआय-गोकुळनगर बायपास गडचिरोली येथे आरोग्य, संरक्षण, महसुल, बँकिंग, इत्यादी शासकीय निमशासकीय क्षेत्रात निवड झालेल्या माळी समाजातील युवकयुवतींसमोर बोलतांना त्यांनी स्वतःची गाडी, माडी व बायकोला साडी या संकुचीत स्वार्थी भावनेत गुरफटुन न राहता इतरांनाही आपल्यामुळे कशी प्रेरणा मिळेल यासाठी मार्गदर्शन करण्याचे व सामाजीक दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच पैसा आला की स्वतःच्या आईवडीलांकडे दुर्लक्ष करणे, व्यसनाकडे वळणे इ. दुर्गुण शिरकाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

           सत्कारमुर्तींना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरव करण्यात आले. त्यांनी जे थोडक्यात यश संपादन करण्यापासुन वंचित राहले त्यांना मार्गदर्शन करतांना आपण यशस्वी होण्यासाठी कसा संघर्ष केला याबाबत अनुभव कथन करुन स्फुर्ती निर्माण केली तसेच सामाजीक दायीत्व जपण्यासाठी जमेल तेव्हा व जमेल तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याची हमी दिली.

            कार्यक्रमाचे संचालन उमेश जेंगटे व प्रास्ताविक संघटनेचे सचिव रमेश जेंगटै यांनी केले. आभार पुरुषोत्तम लेनगुरे यांनी मानले व फोटोग्राफी देवा फोटो स्टुडीयो यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संघटनांच्या पदाधीका-यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास गडचिरोली माळी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. उपस्थितांच्या स्नेहभोजनाची सोय विद्या सोनुले कॅटरींगतर्फे करण्यात आली होती.