
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी गजानन भोर व त्याचे सोबत सुमित व मोरेश्वर देवतळे यांनी सदर साहित्य चोरी केल्याचे माहितीवरून तिन्ही आरोपीस ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता नमूद आरोपींनी चोरी केल्याचे सांगितल्याने अटक करून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई श्री.राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर,पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम,सहाय्यक फौजदार विलास निमगडे, पोलिस अमलदार सचिन खामकर,सचिन साठे,सतीश झिलपे,सोनू एलपुचेवार यांनी पार पाडली.
फिर्यादी नामे कडू मुंडरे यांनी पोस्टला तक्रार दिली की त्यांचे शेतातील इंजिन किंमत बारा हजार रुपये तसेच ताराचंद पाटील व मालेवाडा येथील शेतकरी यांचे शेतातून प्लास्टिक पाईप असा ऐकून 26 हजार रुपयाचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे.चिमूर येथे अप.क्रमांक 6/ 2025 कलम 303/2/बी एन एस अन्वय गुन्हा नोंद करून तपासात घेतला.