
युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित असलेल्या मिलिंद विद्यालय गौरखेडा (चांदई ) या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान टप्पा क्रमांक दोन मध्ये दर्यापूर तालुक्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
दर्यापूर येथे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी.वानखडे यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
एक लाख रुपये पुरस्कार राशी असलेल्या तृतीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर,संस्थेचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर, उपाध्यक्ष शुभांगीताई थेटे,सचिव गजानन वानखडे, संचालिका शुभांगीताई अभ्यंकर, सहसचिव व सर्व संचालक मंडळ तसेच गौरखेडा ग्रामपंचायत सरपंच मीनाताई शेंदुरकर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.