
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
म्हातारपणाचा सहारा म्हणून वृद्ध कलावंतांनी दोन-तीन वर्षा आधी मानधन करिता समाज कल्याण कार्यालयात फाईल दिल्या होत्या.
त्या फाईल मंजूर न होता पुन्हा ऑनलाईन करण्याकरिता परत पाठविल्यामुळे वृद्ध कलावंतांची तारांबळ उडाली आहे.यामुळे समाजकल्याण विभागाच्या संदेहास्पद कृतीबाबत व भुमिका बद्दल अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह वृध्द कलावंतांचे मनात उभे झालेले आहेत.
वरील विषयावर सविस्तर चर्चा करण्याकरिता,”अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची आढावा बैठक समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष सारिकाताई उराडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10/01/2025 ला घेण्यात आली.
या बैठकीला गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष,तालुका संघटक,जिल्हा संघटक,जिल्हा कार्याध्यक्ष आणि इतर जेष्ठ कलावंत उपस्थित होते.बैठकीमध्ये सर्व वृद्ध कलावंतांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागातील दुरदुरून आलेल्या कलावंतांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची जिम्मेंदारी समितीच्या पदाधिकारी सारिका ताईने घेतली व वृद्ध कलावंतांच्या खात्यामध्ये मानधन येईपर्यंत अखिल भारतीय कलावंत न्यायक समिती सतत कार्यरत राहील अशी ग्वाही दिली.बैठकीला बरेच भजनी,वारकरी,कीर्तनकार,असे विविध कलावंत उपस्थित होते.
कलावंत आढावा बैठकीला उपस्थित असलेले कलावंत तथा विदर्भ कार्याध्यक्ष श्री.तुकारामजी कोंडेकर,ह.भ.प.महाराज श्री.देवरावजी खांडेकर (जिल्हा कार्याध्यक्ष),ह.भ.प.महाराज श्री.जीवनदासजी किनेकर(जिल्हा संघटक),एड.रवींद्र उमाटे-जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,हभप श्री.रामभाऊ जीवतोडे,श्री.जय ठाकरे-जिल्हा संघटक,श्री.गणपत सोनुले-तालुका संघटक,हे आवर्जून उपस्थित होते.
याचबरोबर ग्रामीण भागातील कलावंत श्री.वसंता करंडे,श्री.भैय्यालाल रामटेके,सौ.सुनीता रामटेके,श्री.अधिकराव दाभेकर,श्री.मनीराम बावणे,श्री.तुकाराम राणे,श्री.शामराव पोलोदवार,श्री.भाऊराव चिताळे,श्री.बाबुराव पावडे,श्री.भोजराज गेडाम,श्री.विठ्ठल वाढई,श्री.रमेश काकडे,श्री.सूर्यभान रामटेके,श्री.महेंद्र शेंडे,श्री.चरणदास धारणे,श्री.रेखा धारणे,श्री.नामदेव रामटेके,सौ.कुमुद रामटेके,सौ.शिल्पा दडमल,सौ.जिजा भांडेकर,सौ.वैशाली पीदूरकर,सौ.दर्शना रामटेके,श्रिमती निरंजन रामटेके,सौ.गीता राऊत,सौ.गुलशन खोब्रागडे,सौ.मंदाबाई ईटकलवार,श्री.सुरेश डोलारे,श्री.एकनाथ तांदुळकर वारकरी,श्री.दिवाकर जवादे वारकरी,श्री.पुंडलिक मिसार वारकरी,श्री.भिवसन पाल वारकरी,श्री.दिगंबर शिवणकर-तालुका संघटक हे प्रामुख्याने उपस्थित होते.