
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद अनु.आदिवासी आश्रम शाळा पळसगांव (पि) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व लोकार्पण सोहळा मालती बोकारे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
सर्व प्रथम मान्यवरांचे लेझीमच्या तालीमीत स्वागत करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा तपासे यांनी मनोगत व्यक्त केले भारतीय संस्कृतीचा जगामध्ये अभिमान निर्माण करणारे आणि तरुणांसाठी प्रेरणास्रोत असणारे स्वामी विवेकानंद,प्रमुख अतिथी प्रकाश बोकारे,प्रमुख पाहुणे छोटू राचलवार, सुनिल महे,दिलीप राचलवर,शिंदे, उपस्थित प्राथमिक मुख्याध्यापक बोरकर,माध्यमिक मुख्याध्यापक हटवार,शाळेचे अधीक्षक बन्डू बरडे,शाळेचे अधीक्षीका पिनल गेडाम, शिक्षक जयदेव रेवतकर,कामडी,पुष्पा बन,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.व्ही.बोरकर,माध्यमिक मुख्याध्यापक यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन व्ही.बोरकर,यांनी केले तर आभार एम.एस.मिसार,यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सचिन सेलोकर,लांडगे,मनोज नवले,संजय कुभरे,शेन्डे,सुनिल अलोने,राजू मोहिनकर,राजू कामडी,यांनी विशेष परिश्रम घेतले.