
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर चे उद्घाटन दिनांक ११ जानेवारीला संपन्न झाले. हे निवासी शिबिर आत्मनिर्भर ग्राम समृद्धी साठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित आहे. उद्घाटक म्हणून पराग शंभरकर कामगार अधिकारी राज्य परिवहन महामंडळ,भंडारा हे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी रासेयो स्वयंसेवकाना सांगितले की विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या काळात निर्णय घ्यायला शिकले पाहिजे निरनिराळ्या प्रकारचे स्किल विकसित केले पाहिजे.लवकर वाचन,लवकर लिखाण आणि अवांतर वाचन केले पाहिजे ध्येय निश्चित करताना गोधंळ करू नये.कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक यावले होते.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाविदयालयातील यशस्वी रासेयो स्वयंसेवकाचा चढता आलेख विशद केला. श्रमसंस्कारामुळे व्यक्तीमत्व विकासित होते.प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवकांनी समाजातील प्रत्येकांची मन जोडायला शिकली पाहिजे. राष्ट्रीय निवासी शिबिराचा प्रत्येक रासेयो स्वयंसेवकाना निश्चितच फायदा होईल अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव प्रा.विनायकरावजी कापसे सरपंच ,शोभाताई कोयचाडे, उपसरपंच सचिन डाहूले, सौ. सोनूताई वैदय सौ.प्रियंकाताई भरडे श्री गणेश येरमे सदस्य ग्रा.प कोलारा सौ जिवतोडे मुख्याध्यापक श्रीं किशोर गभने ग्रामविस्तार अधिकारी श्री संजय ठाकरे उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड प्रा.राकेश कुमरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.गजानन चव्हाण प्रास्ताविक डॉ.नितिन कत्रोजवार तथा आभार प्रा.निलिमा तुराणकर यांनी केले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे तथा प्रा.गुणवंत वाघमारे यांनी परिश्रम घेतले. उदघाटन समारंभाला रासेयो स्वंयसेवकांनी भरभरून प्रतिसाद दिला.