
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- नवजीवन कॉन्वेंट एंड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सी.बी.एस.ई.) साकोली, येथिल विद्यार्थ्यांची “पोलिस रेझींग डे सप्ताह” अंतर्गत प्राचार्य डॉ. प्रशांतो मुखर्जी, पर्यवेक्षिका वंदना घोड़ीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व सतिश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.
या क्षेत्र भेटीकारिता ईयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक नुरल हसन पोलिस स्टेशन भंडारा ह्यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब शोधक, श्वान पथक व नाशक पथक तसेच क्राईम ब्रँच, वाहतूक पोलीस याबाबतीत माहितीचे पुरेपूर ज्ञान अवगत करून देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ही माहिती आत्मसात करून घेतली.पोलीस कर्मचारी प्रकाश नागरिकर, अतुल मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कौशल्य विकासासाठी रायफल, बंदुक शुट करण्याचे निकष, आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस सायबर बॉट, भरोसा सेल, कौटुंबिक वाद टाळण्यासाठी पोलिस पथकाच्या उपाययोजना याबद्दल माहिती सांगुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली.
यशस्वितेसाठी जया बडवाईक, अजय बारबुद्धे, जयंत खोब्रागडे, जोशिराम बिसेन, प्रशांत वालदे तसेच नवजीवन कॉन्वेंट एंड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सी.बी.एस.ई.) साकोली चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले.