
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
गोंडवाना विद्यापीठस्तरीय “अविष्कार” संशोधन स्पर्धा दि. 3 ते 4 जानेवारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे घेण्यात आले. यात यादवराव पोशट्टीवार महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेच्या जोरावर अतुलनीय यश संपादन केले.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विज्ञान, सामाजिक समस्या, पर्यावरण संवर्धन आणि नवकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठातील विविध महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर , संशोधक अश्या विवीध स्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेत पदवी स्तरावर मानव विद्या शाखेतुन कु. मृणालीनी वाढई, बि. ए भाग 3 ची विद्यार्थीनी हिला प्रथम पारीतोषीक मिळाले, कु. राधा हांडेकर, बि. ए भाग 3 हिला व्दितीय पारीतोषीक मिळाले. तर वाणीज्य शाखेतून कु. प्रतीक्षा रामटेके हिला व्दीतीय पारीतोषीक मिळाले.
तसेच पदव्युत्तर स्तरावर कु. ऐश्वर्या ढवळे या विद्यार्थीनीला व्दितीय पारीतोषीक मिळाले तसेच कु. तेजस्वीनी बोरकर या विद्यार्थीनीला पारीतोषीक मिळाले. या सर्व विद्यार्थांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. श्रीराम कावळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. अविष्कार स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोनेरे येथे आयोजित राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशामागे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या नेतृत्वात व प्रेरणेतुन महाविद्यालयातील अविष्कार विभाग समन्वयक प्रा. शशिकांत शेंडे, आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थांचे कौतुक करत सांगितले कि, “आमच्या विद्यार्थ्यांच्या मेहनत, सृजनशीलता आणि चिकाटी यामुळे हे यश मिळाले आहे. अविष्कार स्पर्धेत मिळवलेले त्यांचे हे यश महाविद्यालयाच्या गौरवामध्ये भर घालेल.”
या स्पर्धेतील महाविद्यालयाच्या उत्कृष्ट यशाबद्दल महाविद्यालयाचे आधारस्तंभ आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तळोधी या संस्थेचे सचिव नानासाहेब पोशट्टीवार, संस्थेचे अध्यक्ष संदीप पोशट्टीवार, संस्थेचे कोषाध्यक्ष सचिन पोशट्टीवार यांनी विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे अभिनंदन केले.