
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- अतिदुर्गम,अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजीत सामुहिक विवाह सोहळ्यात यावर्षी एकुण पाच जिल्ह्यासह कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशातील एकुण २२ जोडपी विवाहबद्ध झालीत.
देसाईगंज येथील तमाम मुस्लिम जमातच्या वतीने मागील २०११ पासुन सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम राखण्यात आली असून समाजातील गोरगरीब मुला-मुलिंचे वाढत्या खर्चाला बगल देत वेळेची व पैशाची बचत होऊन या निमित्ताने सामाजिक एकोपा जोपासल्या जावा हा उद्देश ठेऊन मागील १४ वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळा पार पाडण्यात येत आहे.
शहराच्या मदिना मस्जिद प्रांगणात हाजी बशीर अहेमद कुरेशी यांच्या मार्गदर्शनात मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता.यात नागपुर,चंद्रपुर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया या पाच जिल्ह्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील एकुण २२ जोडप्यांनी सहभाग नोंदवला. मुस्लिम समाजाच्या वतीने २०११ पासून सुरुवात करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत ३४३ जोडपी विवाहबद्ध करण्यात आली आहेत.
दरम्यान सामुहिक विवाह सोहळ्याला पाच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. स्थानिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी पथक तैनात करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विवाहबद्ध जोडप्यांना समाजाच्या वतीने संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
मुस्लिम समाजाची लोकं सर्वस्वी छोट्या मोठ्या व्यवसायावर अवलंबून असुन अनेकांची परिस्थिती हातावर आणुन पानावर खानारांपैकी असल्याने उपवर मुला मुलिंचे लग्न करू शकत नाहीत.
समाजातील लोकांची आर्थिक स्थितीमुळे आभाळ होऊ नये तसेच अनावश्यक खर्च टाळल्या जावा व वेळेची व पैशाची बचत व्हावी हा हेतू ठेऊन सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची निव टाकण्यात आली असल्याची माहिती या सोहळ्याचे प्रमुख तथा मार्गदर्शक बशीर अहेमद कुरेशी यांनी दिली.यावेळी मुस्लिम समाजातील अनेक गणमान्य प्रामुख्याने उपस्थित होते.विवाह सोहळा मुस्लिम समाजाच्या रितीरीवाजानुसार पार पाडण्यात आला.
आतापर्यंत सामुहिक विवाह सोहोळ्यात ३४३ जोडपे विवाहबद्ध
देसाईगंज येथील तमाम मुस्लिम जमातच्या वतीने २०११ ला पहिला मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला. २०११ पासुन ते २०२५ पर्यंत ३४३ जोडपी सामुहिक विवाह सोहोळ्यात विवाहबद्ध झाली.
यावेळी मदीना मस्जिदचे इमाम मो.नसरुद्दीन,जामा मस्जिदचे मो.जहीर आलम, मोहम्मदिया बरकातिया मस्जिद के इमाम कारी अश्फाक रजा,मौलाना कफील अहमद नुरी,गैसीया हनीफीया मदरशाचे हाफिज मो.इरफान रजा,जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी आरिफ पटेल,हाजी खलील खान,पूर्व नगरसेवक सैयद आबीद आली आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला.
दरम्यान सामुहिक विवाह सोहळ्याचे औचित्य साधून आरमोरी क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्थानिक नगर प्रशासनाच्या वतीने साफ-सफाई आणि पुलिस विभागाच्या वतिने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे सचिव फैज खान, हाजी निसार अहमद,मजीद खान,हाजी शरीफ खान, हाजी राशीदुल हक,जावेद कुरेशी,हाजी रियाज खान, मकसुद खान,राजीक खान, बब्लु भाई,देसाईगंज येथील सर्व मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम समाजाच्या युवकांनी सहकार्य केले.
देसाईगंज येथीलच हाजी अब्दुल रऊफ खान यांच्या मार्गदर्शनात डॉ.गौरव सहारे, डॉ.जर्रीन सद्दाम बैग,डॉ. सोहेल सामी,डॉ.सोहेल खान,डॉ.सुमैया पटेल यांनी सामूहिक विवाह सोहोळ्यात सहभागी झालेल्या सर्व पाहूण्यांची निशुल्क आरोग्य तपासणी केली.
कार्यक्रमाचे संचालन कैसर जमाल शेख, प्रस्तावना व आभार सामुहिक विवाह सोहळा संघटनेचे अध्यक्ष हाजी बशीर अहमद पटेल यांनी विशद केले.