शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चिमूर तालुका अध्यक्षपदी शुभम गजभिये यांची नियुक्ती..

तालुका प्रतिनिधी चिमूर

        सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती तत्परता बघता,”शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी शुभम गजभिये यांची चिमूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

          पुढील काळात अधिक प्रमाणात संघटन बळकट करण्यासाठी व अन्याया विरुद्ध आवाज उठविण्यासाठी शुभम गजभिये यांच्यावर संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी विश्वास दाखवला आहे.

        याचबरोबर शिव-शंभु-शाहु-फुले-आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात ठांमपणे मांडाल अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

     तद्वतच,”जिथे कमी तिथे आम्ही,या तत्वावर चालाल असे नियुक्ती पत्रात संस्थापक अध्यक्षा कडून सुचित करण्यात आले आहे.

      शुभम गजभिये यांची शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चिमूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनी अभिनंदन केले आहे.