
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
दिल्ली :- अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली ( AIDNTWS) नुकतेच दिनांक०५.०१.२०२५ रविवारला कमलादेवी भवन मध्ये (गोलमेज कक्षात ) दीनदयाळ उपाध्याय मार्ग दिल्ली OTI येथे आपले समाजाचे प्रश्न घेऊन लढणारे अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली (AIDNT)या संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आयोजनात बैठकीचे अध्यक्ष स्थानी रविंद्रकुमार होते. प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष जीलेसिंह तर प्रमोद कुरील, फौजासिंह आमदार पंजाब, बालक राम सानंसी, अमरसिंह भेडकुट,Dr. राणू छारी,सह देशातील अठरा राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि प्रतिनिधींचे उपस्थितीत वार्षिक बैठक संपन्न झाले.
सदर बैठकीत मागील वर्षातील संघटनेने केलेले कार्याचा आढावा घेण्यात आले. समोर संघटन मजबूत, संघटन विस्तार व केंद्रसरकार कडे प्रलंबित इदाते आयोगाचे शिफारशी लागू करण्यास केंद्र सरकारवर दबाव आणून समाजाचे सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकिकृत D.N.T ५वी प्रवर्ग सूची तयार करण्यास चळवळ निर्माण करणे.
संघटनेची आर्थिक नियोजन करण्यात येऊन तलागळतील समाजाचे सहकार्य घेणे व येत्या ३१ऑगस्ट २०२५ ला मुक्ती दिवसाचे औचित्त साधून विमुक्त भटक्या, अर्ध भटक्या जमातीच्या समाजाचे एकसंघ एक कोटीच्या जनसमुदायाने दिल्ली रामलीला मैदानावर विशाल जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरविले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आनंदराव वाय. अंगलवार प्रदेश सचिव अशोक दिगांबर जाधव सह विविध राज्याचे प्रदेश अध्यक्ष व प्रतिनिधी आपले मत नोंदविले.
येणाऱ्या ३१ऑगस्ट चे मोर्चाचे प्रचार व प्रसार करण्याचे एकमताने ठरले. नागपूर विभागातून दिपक नागपूरे, जिल्हा अध्यक्ष,सुभाष हजारे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.