
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आयोजित पत्रकार दिनाच्या अनुषंगाने तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळा व स्नेहभोजन आयोजित करून गेल्या 18 वर्षाची परंपरा कायम ठेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुधाकर पाटील भारसाकळे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शितल गॅस एजन्सीचे संचालक प्रा.रघुनाथ इंगळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख देवानंद बोबटे,ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख,अनंत बोबडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ पत्रकार एस एस मोहोड व संजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
याप्रसंगी दर्यापूर तालुक्यातील पत्रकार गजानन देशमुख,अनंत बोबडे,युवराज डोंगरे,शशांक देशपांडे,विलास महाजन,धनंजय धांडे, सचिन मानकर,विनोद शिंगणे,सचिन बोदळे, राम रघुवंशी, विकी होले,अमोल कंटाळे,गौरव टोळे,सूरज देशमुख,रवी नवलकार, धनंजय देशमुख, महेश बुंदे यांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकाराच्या वतीने शशांक देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे सुधाकर पाटील भारसाकळे,प्रा.रघुनाथ इंगळे,गजानन देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख मनोज पाटील तायडे यांनी केले.तर संचलन पत्रकार प्रा.धनंजय देशमुख व आभार प्रदर्शन मनसे उपतालुका प्रमुख पंकज कदम यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा भेट दिली असून त्यांचा सुद्धा सत्कार मनसे दर्यापूरच्या वतीने करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल तराळ राम शिंदे,प्रथमेश राऊत,संदीप झळके,शुभम रायबोले,अनिकेत सुपेकर ,संतोष रामेकर,जनार्दन पाटील गावंडे, बंडूभाऊ सांगोले,भूषण टेकाडे, मंगेश मलीये,सुरेश अप्पा कुल्ली, विनोदराव थेटे,गजानन बावनेर, सोपान धांडे,राजेश तायडे आदी पदाधिकारी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.