
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- पूर्व विदर्भातील मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सामूहिक विवाह सोहळा येत्या 8 जानेवारी रोज बुधवार ला दुपारी 12 वाजतां कमलानगर किदवाई वार्ड देसाईगंज या ठिकाणी संपन्न होणार आहे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा एकूण 22 जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अहेले मुस्लिम जमातच्या वतीने हाजी बशीर पटेल सौदागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात येते.
कोरोना काळातील 2 वर्ष वगळता यंदा मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचा हा बारा वा वर्ष आहे.
यात प्रामुख्याने देसाईगंज मुस्लिम समाजातील युवक प्रामुख्याने पुढाकार घेऊन सर्व नियोजन करतात. मुस्लिम समाजातील वर आणि वधूला अहेले मुस्लिम जमात सामूहिक विवाह सोहळा आयोजन कमेटी तर्फे पलंग, आलमारी आणि सर्व जीवनाआवश्यक वस्तू भेट दिल्या जाते पूर्व विदर्भातील हा मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सामूहिक विवाह सोहळा समजला जातो.
सदर विवाह सोहळ्यात अंदाजे वीस हजारच्या जवळपास लोक शामील होत असतात.विशेष म्हणजे पर राज्यातून ही नागरिक या विवाह सोहळ्यात शामील होत असतात या वर्षी 22 जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत सदर विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील आणि देसाईगंज शहरातील प्रतिष्टीत नागरिक, पत्रकार, राजकीय मंडळी, सामान्य नागरिक आपण सर्वांनी शामील व्हावे असे आव्हान मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे संयोजक आणि प्रमुख मार्गदर्शक हाजी बशीर पटेल सौदागर यांनी केले आहे.ह्या आयोजनात विदर्भातील लोकप्रतिनिधी पण शामील होणार आहेत.