
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- प्रेस क्लब देसाईगंज तर्फे देसाईगंज येथील अर्धसाप्ताहिक त्रिकालनेत्र कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी साप्ताहिक गडचिरोली माझा वृत्तपत्र समूहातर्फे प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांचे शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी प्रेस क्लबच्या सदस्यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले.
समाजातील अनिष्ट प्रथा ना आळा घालणे तसेच सामाजिक समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याच्या उदात्त हेतूने सर्व पत्रकार अहोरात्र प्रयत्नशील असतात पण काही समस्या वृत्तपत्रात मांडत असतांना समाजातील काही लोकांच्या भावना सुद्धा दुखावू शकतात तर काही व्यक्ती नाराज होतात तेव्हा अशा व्यक्ती पत्रकारांवर विविध प्रकारचे आरोप करीत असतात अशा वेळी आपण सर्व पत्रकारांनी संघटीत असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारची मते प्रेस क्लबचे सचिव व तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी राजरतन मेश्राम, लोकमत चे तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम भागडकर, दैनिक नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी दिलीप कहूरके, लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी मो.आरिफ शेख, मो. इलियास खान यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार आणि प्रेस क्लब सदस्य शामराव बारई,प्रेस क्लब अध्यक्ष प्रकाश दुबे, कार्यक्रमाचे संचालन व्हॉइस ऑफ मीडिया चे देसाईगंज तालुका अध्यक्ष विलास ढोरे, यांनी केले. इलियास खान, सहसचिव डॉ. शहजाद खान, रवींद्र कुथे, हेमंत दुणेदार,घनश्याम कोकोडे, अब्दुल वहीद शेख, पंकज चहांदे, हरीश दुबे, आदी उपस्थित होते.