मुरूमगाव येथे व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार दिन साजरा… — रुग्णांना फळ वाटप आणि नागरी सत्कार….

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

          धानोरा तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत सचिवालय सभागृह येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले.

         यावेळी वाईस ऑफ मीडिया शाखा धानोरा चे अध्यक्ष शरीफ भाई कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली शेवंताबाई हलामी सरपंच पन्नेमारा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्गघाटन करण्यात आले.

       याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शिवप्रसाद गवर्णा,आदर्श पत्रकार संघ धानोरा अध्यक्ष दिवाकर भोयर, ए.पी.आय. मिथुन शिरसाट, डॉक्टर राहुल बनसोड ,प्रतिष्ठित व्यापारी मिंटू दत्त, मुख्याध्यापक रेवनाथ चलाख, डॉक्टर घुगे ,वनपाल देशपांडे, आदर्श पत्रकार संघाचे सचिव सिताराम बडोदे ,अभय इंदुरकर ,श्रावण देशपांडे ,प्राध्यापक करमनकर,सोपानदेव मशाखेत्री आदी विविध वृत्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते. 

          प्रथमतः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले. याप्रसंगी गंगाबाई पडोटे सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, संतोष मलिया पोलीस पाटील बेलगाव ,बंडू हरणे पुण्यनगरी शहर प्रतिनिधी धानोरा, देवा कुनघाटकर लोकमत ग्रामीण प्रतिनिधी रांगी, विनोद आखाडे ग्रामपंचायत अधिकारी मुरुमगाव, बाळकृष्ण बोरकर लोकमत ग्रामीण प्रतिनिधी मुरूमगाव आदींचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

          त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ मीडिया व आदर्श पत्रकार संघ धानोरा च्या सर्व पत्रकार सदस्यांचे सुद्धा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळकृष्ण बोरकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश देशमुख यांनी केले. आभार प्राध्यापक भाविकदास करमनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाईस ऑफ मीडिया आणि आदर्श पत्रकार संघ धानोरा येथील सर्व पत्रकार बंधूंचे सहकार्य लाभले.