करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट,साकोली येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली :- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट, साकोली येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” च्या निमित्त 1 ते 15 जाने वाचन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. ग्रंथालय स्वच्छता,ग्रंथ प्रदर्शनी,वाचन कौशल्य कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.तसेच लेखक आणि विद्यार्थी यांच्यातील वाचन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

           याप्रसंगी डाॅ.जितेंद्र कुमार ठाकूर, आणि डाॅ.अंजनकुमार सहाय यांना आमंत्रित करण्यात आले होते. यांनी विद्यार्थ्यांशी वाचन संबंधीत विविध विषयांवर चर्चा केली.

         डाॅ.जितेंद्र कुमार ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की वाचन करतांना ग्रंथ आणि वाचक यामध्ये किती अंतर असावे,कसे बसावे, शक्यतो वाचन कोणत्या वेळी करावे, वाचन करतांना एकाग्रता कशी साधावी अशा विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.

          तर डाॅ.अंजनकुमार सहाय यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जसे ई-बुक,ई-जर्नल्स,ऑनलाइन माहीती यांचा वाचनात कसा समावेश करावा तसेच चॅट जीपीटी सारखे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आले असले तरी संभाषण कौशल्य,उच्चार सुधारण्या करीता वाचन कसे आवश्यक आहे हे पटवून दिले.

            प्राचार्य डॉ.नागेंद्र डहरवाल यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन किती आवश्यक याबद्दल सांगितले. तसेच प्रा.एस.एम. पडोळे यांनी ग्रंथालयात उपलब्ध विविध वाचनसाहीत्य आणि वाचनस्त्रोत याविषयी माहीती दिली तसेच उपक्रमा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धे विषयी माहीती दिली आणि दि.14/01/2025 ला स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेण्याचे आवाहन केले.

           या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका अनुष्का सिंग यांनी केले. आभार प्रा.रोशन गायधने यांनी मानले,कार्यक्रमात शुभम कापसे,प्रदीप इलमकर,प्रनील खोब्रागडे,दिलीप दोनोडे,निश्चल राऊत,मुकेश पारधी तसेच प्राध्यापिका किरण पुस्तोडे, वैशाली मोहतुरे,श्रुती दोनाडकर,प्रनीता दत्ता, वृन्दावनी वैद्य,स्नेहा गोबाडे,प्रणाली टेम्भूर्णे,पायल वडीचार उपस्थित होते.

           कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात श्री.किशोर बनकर,श्री.राकेश करंजेकर, श्री.प्रशांत परिहार, अंकुश मेहर, आचल बारसागडे तसेच सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.