
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
सुर्यकला सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ग्रामगीता महाविद्यालय वडाळा (पैकु) येथे ग्रंथ प्रदर्शनी व वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन ग्रंथपाल संदिप मेश्राम यांनी केले. ग्रामगीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंदे, प्रा.सातव, प्रा. बांबोडे, प्रा. सोनवाने, लेंजे, प्रा. प्रणाली टेंभुर्णे, मुकेश घटे, वेसाई, काटकर यांचे उपस्थित सदर कार्यक्रम संपन्न झाला.
वाचन स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नींदविला. त्यात प्रथम बक्षिस राधिका निखाते, व्दितीय बक्षिस सुमीत मेश्राम, तृतीय बक्षिस शुभांगी आवळे व प्रोत्साहनपर मेघराज नन्नावरे यांची निवड करण्यात आली.
आजच्या विद्यार्थ्यांनी बाहेरच्या जगतात वेळ घालविण्यापेक्षा ग्रंथालयात वेळ घालवावी. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल बंदना शेषकर, संदिप मेश्राम, भावना नेवारे, वर्षा बनकर, आयशा कुरेशी, खोब्रागडे, मुकेश घटे, पंदीलवार यांनी योग्य सहकार्य केले.
चिमुर तालुक्यात हरिभाऊ सार्वजनिक वाचनालय मिनझरी, सार्वजनिक वाचनालय सोनेगांव (बेगडे), सुरजकला युवा वाचनालय चिमुर, रुचिका सार्वजनिक वाचनालय खडसंगी, समाजसेवा सार्वजनिक वाचनालय मालेवाडा, बाळशास्त्री जांभेकर सार्वजनिक वाचनालय शेडेगांव यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत आपआपल्या परिसरात कार्यक्रम राबविला.
शासनाने दिलेला उपक्रम अत्यंत सुंदर असुन वाचन प्रकल्पास बळ देणारा आहे. विद्यार्थ्यास वाचणाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ग्रंथपाल वंदना शेषकर यांनी केले