आठवले समाजकार्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

            आठवले समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्य वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम अंतर्गत ग्रंथ वाचन व प्रदर्शनाचा प्राचार्या डॉ. शुभांगी लुंगे, प्रमुख पाहुणे ग्रंथमित्र सुभाष शेषकर, रासेयी कार्यक्रमाधिकारी डॉ. राजु कसारे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

           प्राचार्या डॉ. शुभांगी लुंगे यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला,महिला जागृत झाली. आज महिलांना विशेष संधी व स्थान प्राप्त झाले असुन मुली शिक्षण घेत आहेत असे सांगितले.

          तर रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. राजु कसारे यांनी सावित्रीबाई फुले नसत्या तर आज मुलीची, महिलाची प्रगती झालीच नसती. चुल, घर व मुल हीच परिस्थिती असती. ग्रंथमित्र सुभाष शेषकर यांनी साविनीबाई यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व सावित्रीच्या कार्याचा वसा घ्या असे विद्याथ्यांना आवाहन केले.

          सदरचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथपाल बांगडे, ग्रंथालय सहायक मोहन गुरले, विद्यार्थीनी कोमल वंजारी यांनी वाचनावर प्रकाश टाकला. तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथाचे वाचन करून वाचन संकल्प महाराष्ट्राचा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. राजु कसरि यांनी मानले.