अमोल बी.सोनार यांच्या चारधाम यात्रेला अनेकांचे पाठबळ व आशीर्वाद!

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

       अमोल बी.सोनार,गरीब साम्राज्य चाळीसगाव यांच्या वडीलांची चारधाम यात्रा करावी अशी इच्छा होती.

       पण,घरात अठराविश्व दारिद्री असल्यामुळे त्यांची इच्छा पुर्ण होऊ शकली नाही.अमोल सोनार यांनी आपल्या वडीलांची ईच्छा पुर्ण करण्याकरीता खिशात एक पैसा नसताना,गोरगरीबांच्या आशिर्वादाने आणि महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारान्वये भारत भ्रमण यात्रा 2024 शेगाव येथुन श्री.गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सुरु झाली होती.

               सदर यात्रा अंतर्गत आता पर्यंत अमरनाथ केदारनाथ मंदिर,बद्रीनाथ,माता वैष्णोदेवी,राजस्थान मध्ये चितौड़गढ़ महाराणा प्रताप,अजमेर शरीफ,पंजाब मध्ये अमृतसर सुवर्ण मंदिर, लड्डाख बाॅर्डर गुजरात मधील सोमनाथ मंदिर,अहमदाबाद महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देऊन झाल्यात.

     जवळ जवळ पुर्ण भारतात चारधाम यात्रा झाली असुन 2025 मध्ये यात्रा राहिलेल्या ठिकाणी होणार आहे.त्या मध्ये नेपाळ पशुपतिनाथ,रामजन्मभूमि अयोध्या,यात्रा खाटु श्याम उज्जैन महाकाल,महाराष्ट्रात चैत्यभुमी,दीक्षाभुमी,अजी अली दरगाह मुंबई दर्शन पुणे,देऊ आंळदी अष्टविनायक,माहुर गड, वणी गड,कोल्हापुरची आंबा माता तुळजाभवानी,धुळे एकविरा माता,अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर,यासह महाराष्ट्रातील बरेचशा धार्मिक स्थळे,पर्यटन स्थळे,हिमाचल प्रदेश असे अनेक धार्मिक स्थळांना गरीब साम्राज्याचे अमोल सोनार भेटी देणार आहेत.

     त्यांना साधु संताचा आशिर्वाद असुन मित्र परिवार यांच्या सहकार्याने भारत भ्रमण यात्रा 2025 होणार आहे.