
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
3 जानेवारी रोजी देऊळ मोहला इंदाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाई फुले महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मला अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निखारे सरपंच पारडी यांच्या उपस्थितीत मोहन ठाकरे सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी मंचावर डॉ.दीप्ती अभिजीत माटे डॉक्टर मेघा रोनक फेबुलवार परमानंद पुण्यमवार ग्रामपंचायत सदस्य नवेगाव अभिजीत कोरडे मनोज श्रीराम जेंगठे सरपंच इंदाळा डॉ.रोनक फेबुलवार घनश्याम मुरवतकर उपसरपंच पारडी दत्तू सूत्र पवार विकास गेडाम उपसरपंच इंदाळा हेमंत मशाखेत्री ठेकेदार नवेगाव परशुराम मोहुरले क्षेत्र सहाय्यक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवराने सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी प्रभात फेरीने झाली सायंकाळी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित लहान बालकांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावातील मान्यवर या सर्वांनी सहकार्य केले.