नेरी तंमुसच्या वतीने प्रेमीयुगुल विवाहबद्ध… — चिमुर तालुक्यातील नेरी येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे वतीने एका प्रेमविरांना विवाहबद्ध करण्यात आले…

          रामदास ठुसे 

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

        शुभम गजभिये 

           विशेष प्रतिनिधी 

            आज दि ४ जानेवारी २०२५ रोजी शंतनु शांतीलाल राठोड वय २१ वर्ष शिक्षण बिए रा.नेरी जात तेली व निराशा विनोद पर्वते रा.शिवनपायली जात कोहळी शिक्षण बिए ता.चिमुर या दोन्ही प्रेमीयुगुलांनी नेरी तंमुसकडे रितसर अर्ज केला की आमचे महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री जुळली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात होवु लागले एकमेकांवर जीवापाड प्रेम करु लागलो त्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

            मात्र मुलीकडील घरच्यांचा याला विरोध होता तेव्हा दोन्ही उभयतांनी तंटामुक्त गाव समिती नेरी कडे अर्ज सादर केला. समीतीचे अध्यक्ष व सदस्यांनी अर्जाची व अन्य कागदपत्रांची तपासणी करून लग्नाचे वय २१ वर्षाचे वर असल्याने लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

        हिंदू रितीरिवाजानुसार मंगलाष्टके घनश्याम लोथे यांनी गायीले व विवाहबद्ध करण्यात आले. 

         यावेळी तंमुस अध्यक्ष हरीदास चांदेकर, निमंत्रक पोलिस पाटिल शुद्धोधन घोनमोळे, उपसरपंच चंद्रभान कामडी, रुस्तमखा पठाण, डॉ. रमेश राऊत,संजय नागदेवते , डॉ.जगदीश पिसे,मानिक नगराळे, पलाश हिंगे ,मिलिंद जांभुळकर, संदीप पिसे, दशरथ पिसे,लिलाधर पिसे, पिंटु खाटीक,तंमुस सदस्या सत्यभामा कामडी, गंगाबाई कामडी, मुलाकडील मंडळी गावकरी महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी नवोदित वधु वरास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.