विठ्ठलगाव येथील मंजूर झालेल्या शिवमंदिर ते गाढवी नदीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याचे भूमिपूजन…

ऋषी सहारे 

  संपादक

देसाईगंज :- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विठ्ठलगाव येथील मंजूर झालेल्या शिवमंदिर ते गाढवी नदीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते संपन्न झाले.

          यावेळी गजबे यांनी शिव मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली व गावकरी मंडळी सोबत संवाद साधला.

          याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, सरपंच विजय दडमल, उपसरपंच पंकज वंजारी, ग्रा.पं. सदस्य नरेंद्र गजपूरे, नरेश हरडे, महेंद्र सोंनपिपरे व गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.