केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यावर अट्रासिटीच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल होणार? — घटनातज्ञ विनोद खोब्रागडे यांची फौजदारी पिटिशन वरोरा न्यायालयात रजिस्टर…..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

      अखेर केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात सात दिवसानंतर दिनांक ०३/०१/२०२५ रोजी फौजदारी खटला रजिस्टर झाला आहे…

      फौजदारी पीटिशन नंबर १०/२०२५ असुन सुनावणी दिनांक १६/०१/२०२५ ला आहे.

      भारतातील ही पहिलीच केस आहे,एखाद्या केंद्रीय गृहमंत्री असलेल्या व्यक्तीवर फौजदारी खटला दाखल करन्याची.

       एक लक्षात घ्या कायद्यापुढे सर्व समान आहेत,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.

       फिर्यादी संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक आणि कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर यांनी फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.

         सविस्तर असे आहे की,दिनांक १८/१२/२०२४ आहे रोजी संसद भवन येथे भारताचे केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांनी कायदेपंडित,ज्ञानाचे प्रतीक,संविधान निर्माते ज्यांच्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी शब्द बोलताना,”आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर, आंबेडकर हे फॅशन आहे असे हातवारे करून,वारंवार अपशब्द बोलत होते,इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर,”स्वर्ग, मिळाला असता असे बेताल वक्तव्य संविधानीक पदावर बसुन बोलत होते व त्यांचा पक्षाचे खासदार हसत होते.

         हे सर्व दृष्य लाईव इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवत होते,माझ्या सह संपूर्ण देश हे बघत होते,व मन विचलित करीत होते.यामुळे करोडो करोडो समाज बांधवांचा भावना दुखावल्या आहेत.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे “फॅशन” नाही तर “मिशन” आहे..

       भारतात एकशे चाळीस करोड जनसंख्या असलेल्या देशात सर्व अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देऊन लोक चुपचाप बसले.

        मात्र घटना तज्ञ विनोद खोब्रागडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात प्रथम पोलिस प्रशासन,महसूल प्रशासन यांना गंभीर तक्रार केली होती व सात दिवस वाट बघितली होती.परंतू पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही.

        यामुळे विनोद खोब्रागडे यांनी नंतर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात श्री.अमीत शहा यांच्या वर अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी पीटिशन वरोरा न्यायालयात दाखल केली.

       दिनांक ०३/०१/२०२५ रोजी रजिस्टर झाली असून खटला क्रमांक १०/२०२५ असुन सुनावणी दिनांक १६/०१/२०२५ ला आहे.

*****

जनहितार्थ जारी…

       समाजहितासाठी-देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी-लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे व कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय व हक्क मिळवून घ्यावे…

— फेक न्युज पासून सावधान राहावे…

*****

.            आपला अनुयायी..

संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे…

        जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर..

संपर्क क्रमांक…

९८५०३८२४२६/८३२९४२३२६१