“भारत यात्रा”वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न… — अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कुल साकोलीचे आयोजन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली : एकोडी रोड स्थित अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कुल साकोली येथील “भारत यात्रा वार्षिक स्नेहसंमेलन” – २०२४ चे ३१ डिसें. ला संपन्न झाले. यात मुलामुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पालकवर्ग भारावून गेले होते. तर अतिथींनी मुलांवर बक्षिसांची लयलूट केली होती. 

          दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्ष संचालक स्पर्श हाॅस्पिटल भंडारा डॉ. राजदिप चौधरी, प्रमुख अतिथीत अध्यक्ष समर्पण बहुउद्देशीय विकास संस्था डॉ. राजेश चंदवानी, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सचिव डॉ‌. गिता चंदवानी, पाथरी सरपंचा पुजा देशमुख, प्राचार्या डॉ. संचिता ब्रम्हचारी, शाळा व्यवस्थापक जी. एच. ठाकरे व पालकगण उपस्थित होते. अतिथी डाॅ. चौधरी ह्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बालकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शरीर आरोग्य व बौद्धिक विकास करण्यात अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे.

         बदलत्या शिक्षण प्रणाली नुसार आजच्या स्पर्धात्मक युगात पालकांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत करून सहकार्य करावे. डॉ. राजेश चंदवानी म्हणाले पालकांनी पालक शिक्षक सभेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्याविषयींच्या समस्याचें निराकरण शिक्षकांकडून करून घ्यावे. विद्यार्थ्याना शिस्तीत राहणे आणि चांगले वर्तन करणे ह्याकडे शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जाते. शिक्षक हा ज्ञानाचा सागर आहे असे म्हटले जाते. असे प्रतिपादन केले. 

        समारोपीय कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, अतिथी वन अधिकारी संजय मेंढें, जि. प. स. दिपलता समरीत, सावरबंद सरपंचा माधुरी बडवाईक हजर होते. ठाणेदार संजय गायकवाड यांनी वक्तव्यात म्हटले की, मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे होवू द्या, आयुष्यात तुमचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक होण्यापेक्षा एक आदर्श व्यक्तिमत्व असणारा नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील रहावे व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय योजना पालकांना समजावून सांगितले.

         सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीची सभ्यता आजतागायत अबाधित असल्याचे यथोचितरित्या प्रदर्शन केले. रक्षाबंधन, बैसाखी, ईद मुबारक, होळी बैलपोळा, जन्माष्टमी, गणपती उत्सव, नवरात्र, रासगरबा, दिवाळी मकरसंक्रांती इत्यादी पारंपारिक उत्सवाची माहिती देणारे नृत्य, आदिवासी नृत्य, बंगाली नृत्य, देशभक्तीपर नृत्य, चंद्रायान -३, शालेय एकांकिका, प्लास्टिक मुळे होणारे नुकसान, झाडे लावा झाडे जगवा, सामाजिक व कोळी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. 

          यशस्वीतेसाठी मनोजकुमार पेटकुले, निखिल निंबेंकर, धनराज मेश्राम, केतन हत्तीमारे, शेहबाज खान, सचिन मारवाडे, धामेद्र वलथरे, मोहन रहिमतकर, मृनाली कोसे, नंदा कापगते, सारिका ठाकरे, लता कटरे, शिवाली गुप्ता, पुष्पलता आसलवार, ममता सरोदे, पुनम वाडीभस्मे, प्रिती धुर्वे, मयुरी हटवार, शिरीन शेख, संगिता हुमने, योगिता भेंडारकर, विजया भेंडारकर, कृपाली राऊत, निशा रामटेके, दिक्षा गेडाम, श्रृनाली जंवजाळ, अलविया पठाण, आयेशा पठाण, निता भोयर, रेश्मा ढोमने, छाया राऊत, श्रमिका पातोडे, ज्योती बडोले, यशी टंग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. संचिता ब्राह्मचारी, जी. एच.ठाकरे ह्यांनी केले. 

         संचालन रिना फ्रॅन्सिस, मृनाली कोसे, कु. लेखी पुस्तोडे, समारोपीयात अमितोज कौर, शिवाली गुप्ता, केनिशा जगिया, समृद्धी अग्रवाल ह्यांनी केले. तर आभार अतुल नंदेश्वर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.