
रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी तळोधी (नाईक ) येथे निवडणूक काळात प्रचार दरम्यान सामाजिक सभागृह बांधकाम करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आणि खनीज विकास निधीतुन ४० लक्ष रू. निधी मिळवून देण्यात यश आले.
तळोधी (नाईक ) येथे खनीज विकास निधी अंतर्गत ४० लक्ष रू. चे प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका बांधकाम करणे च्या सभागृहाचे भूमिपूजन प्रसंगी माजी सभापती प्रकाश वाकडे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी संचालक ओमप्रकाश गनोरकर, माधवराव वाकडे, माजी सरपंच कलीम शेख,उपसरपंच प्रकाश धानोरकर, ग्रामसेवक चौधरी,किशोर येसाबरे,नामदेव नन्नावरे,रमेश भोयर,सलीम शेख,अंकुश मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी तळोधीचे माजी सरपंच कलीम शेख ओमप्रकाश गनोरकर, प्रकाश वाकडे यांनी आपले विचार व्यक्त करीत असताना आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर प्रकाश टाकीत सभागृहात चांगले विचार घडविण्यासाठी प्रयत्न करावे आणि गावात एकोपा निर्माण व्हावा मार्गदर्शन केले.
संचालन नीलकंठ जांभूळे तर प्रास्ताविक उमदेव गजभे, आभार कु. जयश्री वाकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्या करिता घुमदेव गजभे, दिलीप चौधरी, सुनील खाटे, सुभाष नन्नावरे, विनोद सोनवणे, प्रवीण वाकडे, सचिन वाकडे यांचे सह माना समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला गावकरी व माना समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.