
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गोंदेडा तपोभुमीमध्ये ६५ वा गुंफा यात्रा महोत्सव दिनांक ९ जानेवारी ते १३ जाने २०२५ पर्यंत महोत्सव साजरा केला जाणार आहे.
जय बोलो मानवता की जय बोलो सब जनता की,
विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे असे सांगणारे मानवतेचे महान पुजारी ब्रम्हलीन वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेला गुंफा यात्रा महोत्सव विविध कार्यक्रमांने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
दिनांक ९ जानेवारीपासून गुंफा यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार असुन दि.१३ ला गोपाल काला महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
दरम्यान या पाच दिवशीय महोत्सवाच्या दैनंदिनी मध्ये ग्रामसफाई, श्रमदान, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य निदान शिबिर, ग्रामगीता पाठांतर स्पर्धा ,भजन संध्या, महीला मेळावा, चंद्रपूर जिल्ह्यातील युवक तथा गुरुदेव भक्तांचा कार्यकर्ता मेळावा , किर्तन ध्वजारोहण,रामधुन, पालखी मिरवणूक, सत्कार समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ध्वजारोहण दि. १३ ला स.८.३० वाजता मिथुन नामदेव गुरनुले अध्यक्ष श्री गुरुदेव साधना श्रम गुंफा यात्रा महोत्सव समिती गोंदेडा यांच्या शुभहस्ते होणार असुन या ध्वजारोहण कार्यक्रमाला साधनाश्रम गुंफा यात्रा महोत्सव समितीचे सर्व सदस्य श्री गुरुदेव गुंफा समीतीचे सर्व सदस्य,पालखी प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व गुरुदेव भक्त गण राहणार आहेत.
गोपालकाला आणि महाप्रसाद सोमवार दि. १३ जाने ला सकाळी ११ वा हभप लक्ष्मण दास काळे महाराज गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या हस्ते होणार आहे.
या गोपाल काल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणदास गमे सर्वाधीकारी गुरु कुंज आश्रम मोझरी, सरपंच गीरीजा गायकवाड, विठ्ठल सावरकर, डॉ.नामदेवराव किरसान खासदार चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र, बंटीभाऊ भांगडीया संचालक अभागुसेमं गुरुकुंज आश्रम मोझरी तथा आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र, रामदासजी आंबटकर आमदार विधानपरिषद म.रा,मितेशजी भांगडीया माजी आमदार विधानपरिषद म.रा.आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे .
या पाच दिवसीय महोत्सवात भाग घेणाऱ्या स्पर्धकांना रोख स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तरी या महोत्सवात भावीक भक्तांनी जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, शोभा वाढवावी असे आवाहन श्री गुरुदेव गुंफा समीती गोंदेडा,श्री गुरुदेव साधना श्रम गुंफा यात्रा महोत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.